3.5 C
pune
November 16, 2022

पुण्यातील विचित्र घटना | २ चुलत जावांचे एकमेकांच्या नवऱ्यांवर बलात्काराचे आरोप

पुणे : दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येतात. काही बातम्या अशा असतात की, ज्या तुम्हाला आश्चर्यचकीत करतील. पुण्यात दोन जावांनी एकमेकींच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नात्याने एकमेकींच्या जावा असणाऱ्या दोन महिलांनी एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याची धक्कादयक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे.

राजगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही तक्रारीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या गटामधील चार व्यक्तींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तक्रारदार महिला नात्याने एकमेकींच्या चुलत जावा आहेत आणि त्यांनी एकमेकींच्या नवऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत.

एका महिलेने सांगितले की, माझ्या जावेच्या नवऱ्याने माझ्यावरती शेतातील गोठ्यात बलात्कार केला, तर दुसरीचे म्हणणे आहे की, तिच्या जावेच्या नवऱ्याने तिला लॉजवर नेऊन बलात्कार केला आहे,  भोर तालुक्यामध्ये बलात्काराचे हे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Crime)

यात ती महिला म्हणाली की, ती ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता चुलत दिराने तिला शेतातील गोठ्यात बोलवून तिचा विनयभंग केला. या गुन्ह्यात एका महिलेने तिच्यावर 10 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान बलात्कार केल्याप्रकरणी तीन लोकांवरती आरोप केला आहे. अन्य दोन लोकांनी गोठ्यामध्ये येऊन सामूहिक बलात्कार (Gang rape) केला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी (Main accuse) ठरवण्यात आलेल्याच्या व्यक्तीच्या पत्नीने देखील पीडित महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला आहे.

तिने तक्रारीत सांगितले की, ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर राहत्या घरी आणि लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime)

हे प्रकरण गुंतागुंतीजे दिसत असले तरी, कदाचित यामधील एका व्यक्तीचा आरोप चूकीचा असू शकतो. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत आणि याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

Related posts

होणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं

cradmin

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1