3 C
pune
November 17, 2022

OnePlus 9RT भारतात दुसऱ्या नावाने होणार लाँच? काय असेल नाव?


OnePlus 9RT : वन प्लस कंपनीचे फोन अनेकांना आवडतात. OnePlus 9RT हा फोन चिनमध्ये गेल्या महिन्यात लाँच झाला. रिपोर्टनुसार, भारतामध्ये हा फोन  OnePlus RT या नावाने लाँच केला जाणार आहे. OnePlus 9R  हा भारतात एप्रिल महिन्यामध्ये लाँच करण्यात आला होता. टिप्सटर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहिती नुसार OnePlus RT या फोनला भारताच्या OnePlus Care अॅपवर पाहिले गेले आहे. या आधी देखील गूगल सर्च रिझल्ट पेजवर Amzon India च्या लिस्टमध्ये   वन प्लस आर टी या फोनचा उल्लेख आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की भारतामध्ये हा फोन लाँच करण्यात येणार आहे. OnePlus RT या फोनचे स्पेसिफिकेशन्स हे  OnePlus 9RT सारखेच असणार आहेत.  

OnePlus 9RT मध्ये 4,500mAh बॅटरी आहे आणि 65W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. OnePlus 9RT या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus RT हा फोन पुढील महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये दोन व्हेरियंट असू शकतात. हा फोन चिनमध्ये तीन व्हेरिअंट्स सह लाँच केला गेला. बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. तर टॉप व्हेरियंटमध्ये तर 12GB रॅमसह 256GB स्टोरेज  देण्यात आले आहे.

OnePlus 9RT मध्ये 50-megapixel SONY IMX766 सेन्सर आहे जे  प्रायमरी आहे. OnePlus 9RT मध्ये 4,500mAh बॅटरी आहे  तसेच 65W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा- Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1