1.5 C
pune
November 16, 2022

Reliance Jioचा रिचार्जही महागला, पाहा प्लॅनचे नवे दर…


Reliance Jio New Tariffs : Reliance Jio ने ही प्रीपेड टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले आहेत. याआधीएयरटेल (Airtel) आणि  व्हीआय (VI) ने प्लॅनच्या दरात वाढ केली होती. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जिओनंही प्रीपेड प्लॅनची किंमत वाढवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, जिओनं असा दावा केला आहे की, प्लॅनच्या दरात वाढ करण्यात आली असली तरीही जिओचे प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्याच्या प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत. रिलायन्स जिओनं रविवारी प्रीपेड प्लॅनच्या नव्या दरांची घोषणा केली आहे. यावेळी जिओनं म्हटलंय की, दरात वाढ केली असली तरी सर्वात स्वस्त दरात ग्राहकांना उत्तम सेवा पुरवण्याचं काम रिलायंस जिओ करणार आहे. रिलायंस जिओचे नवे दर 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

रिलायन्जिस जिओ कंपनीच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीनं म्हटलं आहे की, “येत्या काळात प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थानं चांगली डिजिटल सुविधा देण्यासाठी जिओनं आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम इंन्डस्ट्रिजमधील सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. जगभरात सर्वात स्वस्त दरात आणि चांगल्या गुणवत्तेचे रीचार्ज प्लॅन्स देण्यासाठी जिओ नेहमी प्रयत्नशील आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना याचा लाभ मिळेल.”

रिचार्ज महागला
जिओचा आधीचा सर्वात स्वस्त 75 रुपयांचा प्लॅन आता 91 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि 50 एसएमएस मिळणार असून याची वैधता 28 दिवसांपर्यंत असणार आहे. जिओचा 129 रुपयांना मिळणारा प्लॅन आता 155 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा आणि 300 एसएमएस मिळतील. यासह जो प्लॅन 2399 रुपये किमतचा प्लॅन आता 2879 रुपये किंमतीचा असेल. यामध्ये दिवसाला 2 जीबी डेटा शिवाय 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल. 

जाणून घ्या प्लॅनची बदललेली किंमत

Reliance Jio New Tariffs : Reliance Jioचा रिचार्जही महागला, पाहा प्लॅनचे नवे दर...

 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1