1.3 C
pune
November 16, 2022

डिसेंबरमध्ये येणार ‘या’ दमदार बाईक, किंमत 60 हजार रुपयांपासून सुरु


Bike and Scooter Launching In December 2021 : तुम्ही नवी टू व्हिलर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे डिसेंबरमध्ये नव्या बाईक आणि स्कूटर लाँच होणार आहे. यामध्ये स्पोर्टस बाईकपासून इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. 

Bounce Infinity : आज भारतात बाऊंस इन्फिनिटी (Bounce Infinity) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. या स्कूटरची किंमत 92,000 रुपये इतकी आहे. जर तुम्ही यातील ‘Battery as a service’ हा पर्याय निवडल्यास तुम्हांला ही स्कूटर 60,000 रुपये किंमतीला मिळेल. या स्कूटरची प्री बुकींग सुरु असून तुम्हांला केवळ 499 रुपयांमध्ये प्री बुकींग करता येईल. 

KTM RC390 : केटीएमची आरसी 200 (KTM RC200) बाजारात आली तेव्हाचं कंपनीनं केटीएम आरसी 390 (KTM RC390) लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या महिन्यात केटीएम लवकरच KTM RC390 चं अपडेट वर्जन बाजारात आणू शकते. या बाईकमध्ये 373.2 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ज्यामध्ये 43.5 पीएस पावर जनरेट होते.

Harley Davidson Sportster S : हार्ले डेविडसन (Harley Davidson) कंपनीनं आधीच नवीन बाईक लाँच करण्याची घोषणा केली आहे. भारतात ही बाईक ‘इंडिया बाईक वीक’  (India Bike Week) दरम्यान 4-5 डिसेंबरला लाँच होणार आहे. या बाईकची किंमत 14-15 लाख रुपयांपर्यंत असेल. या बाईकचं प्री बुकींग सुरु झाली आहे. यामध्ये 121 बीएचपी पावरचं इंजिन आहे.

Yezdi Roadking ADV : येजदी (Yezdi) कंपनीही भारतात बाईक लाँच करणार आहे.  डिसेंबरमध्ये Yezdi Adventure आणि Roadking Scrambler या बाईक लाँच होणार आहे. येजदी एडीवी (Yezdi ADV) मध्ये 334 सीसीचं इंजन आहे. येजदीची Roadking Scrambler बाईक याआधीच परिचित आहे. येजदी रोड किंग बाईकमध्ये 293 सीसी इंजन असेल.

Kawasaki W175 : कावासाकी w175 बाईकही ‘इंडिया बाईक वीक’ लाँच करण्याची शक्यता आहे. ही भारतातील कावासाकीची सर्वात स्वस्त बाईक असेल.  कावासाकी w175ची एक्स शोरुम किंमत
1.75 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये 177 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. 

इतर संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

Car loan Information:
Calculate Car Loan EMISource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1