1.1 C
pune
November 17, 2022

नोकरी, Job Search होणार आणखी सोपं, LinkedIn आता हिंदी भाषेमध्येही


LinkedIn : लिंक्डइन (LinkedIn) वापरणाऱ्या भारतीयांसाठी एक खुशखबर आहे. लिंक्डइनवर आता हिंदी भाषेत तुम्हांला नोकरी शोधता येणार आहे. लिंक्डइननं भारताची राष्ट्रभाषा हिंदीचा समावेश केला आहे. त्यामुळे आता तुम्हांला लिंक्डइनवर हिंदी भाषेत जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कींग प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेत माहिती मिळवता आणि शेअर करता येणार आहे. कंपनीनं आज LinkedIn वर हिंदी ही पहिली भारतीय प्रादेशिक भाषा लाँच करून एक नवीन पायंडा घातला आहे. भारतात सुमारे 60 कोटी हिंदी भाषिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

लिंक्डइननं आजपासून पहिल्या टप्पा (Phase 1) ला सुरु केली आहे. यामध्ये युजर्सला नोकरी, फीड, प्रोफाईल आणि मेसेज हिंदीमध्ये पाठवता येणार आहे. याद्वारे तुम्हांला डेस्कटॉप, अँड्रॉईड मोबाईल आणि आयफोनमध्ये हिंदी भाषेचा वापर  करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये, LinkedIn जास्तीत जास्त बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यांसह उद्योगांमध्ये हिंदी भाषिक व्यावसायिकांसाठी उपलब्ध नोकऱ्यांच्या संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करेल.

अमेरिकेनंतर भारत सर्वात मोठी बाजारपेठ
भारत लिंक्डइनच्या उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लिंक्डइन युजर्समध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून यामध्ये सुमारे 80 कोटी युजर्स आहेत. गेल्या तीन वर्षात भारतीय लिंक्डइन युजर्समध्ये च्या सदस्यसंख्येमध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी युजर्सची वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर लिंक्डइनवर लोकांचा सहभाग आणि परस्पर संवादात वाढ झाली आहे.

25 भाषांमध्ये लिंक्डइन उपलब्ध
लिंक्डइनचं उद्दीष्ट भाषेच्या अडचणी दूर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आहे. हिंदी भाषेमुळे सुमारे 60 कोटी हिंदी भाषिकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. हिंदीभाषेसह लिंक्डइन आता जागतिक स्तरावरील 25 भाषांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, लिंक्डइन मराठी भाषेत कधी येणार याची उत्सुकता मराठी भाषिकांना लागली आहे.

हिंदी भाषेचा पर्याय कसा निवडाल?
लिंक्डइन मोबाईल अॅपमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी फोन सेटिंग्समध्ये जाऊन आवडत्या भाषेसाठी हिंदी भाषेचा पर्याय निवडावा लागेल. ज्या युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये हिंदी भाषेचा पर्याय आधीच निवडलेला असेल, त्यांच्या स्मार्टफोनवर लिंक्डइनचा आपोआप हिंदीमध्ये उपलब्ध होईल. डेस्कटॉपवर, लिंक्डइन वापरणाऱ्यासाठी LinkedIn होमपेजच्या सुरुवातीला ‘मी’ चिन्हावर क्लिक करुन ‘सेटिंग्ज अँड प्रायवसी’ पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर डाव्या बाजूला ‘अकाऊंट्स प्रिफरेंसेस’ मध्ये ‘साईट प्रिफरेंसेस’ ऑपशन सिलेक्ट करून ‘लँग्वेज’ आणि पुढे ‘चेंज’वर क्लिक करत हिंदी भाषेचा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
यानंतर तुम्हांला LinkedIn वर हिंदी भाषेचा वापर करता येईल.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1