1.1 C
pune
November 17, 2022

हर हर महादेव… सोनगडाच्या पायथ्याशी हजार फूट दरीतील 800 किलोंची तोफ गडावर आणली


Sindhudurg News : जैवविविधतेने संपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हिरवाईने नटलेला आहेच. त्यासोबत अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्यासह जिल्ह्यात आणखी 23 किल्ले आहेत. विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते, रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग, निवती, यशवंतगड, खारेपाटण, भैरवगड, सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड, नारायणगड, महादेवगड, हनुमंतगड, बांदा असे किल्ले आहेत. मात्र यातील अनेक किल्ले हे भग्नावस्थेत आहेत.

सोनगड हा नरसिंह गड म्हणून ओळखला जातो. खरं तर हा गड टेहाळणीसाठी महत्वाचा गड होता. समुद्र मार्गे आलेल्या मालाची घाटमाथ्यावर वाहतूक तसेच बाजारपेठे नेल्या जाणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी सोंनगडाची महत्वाची भूमिका होती. या गडा संदर्भात फारशी माहिती उपलब्ध नाही. 

Sindhudurg News : हर हर महादेव... सोनगडाच्या पायथ्याशी हजार फूट दरीतील 800 किलोंची तोफ गडावर आणली

मावळा प्रतिष्ठानच्यावतीने गडकिल्ल्याचे संवर्धन, स्वच्छता करून शिवरायांचे विचार सर्वदूर पोहोचावं, खरा इतिहास, शिवकार्य लोकांना माहिती व्हावं यासाठी मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असतात. 7 ते 8 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध शिवकालीन किल्लाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुर्ग संवर्धनासोबत परिसर स्वच्छतेवर या माध्यमातून भर देण्यात येतो. आतापर्यंत प्रतापगडावर दिपोत्सव, शिवनेरी दुर्ग संवर्धनासह वेगवेगळे उपक्रम, रांगणा किल्ल्यावरून अठराशे फूट खोल दरीतुन एक हजार किलोची तोफ गडावर नेण्याच काम केलं आहे. प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी सभासद एकत्र येऊन दुर्ग संवर्धन तसेच स्वच्छता मोहिमेवर निघतात. याच मोहिमेचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे मार्गावरील सोनगडावर साफसफाई करताना गडनदीच्या उगमस्थानी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी टाकलेल्या गडावरील रांगणा तोफ गडावर आणल्याच मावळ्यांनी ठरवलं. एक हजार फूट खोल दरीत आठशे किलोची ही तोफ गडावर आणण्यासाठी तीन दिवस मावळा प्रतिष्ठाने प्रयत्न केले. आणि अखेर अंगाचा थरकाप उडवणाऱ्या सोनगडाच्या पायथ्याशी एक हजार फूट खोल दरीतून आठशे किलोची तोफ सोनगडावर आणली. 

सोनगडाच्या पायथ्याशी असलेल्या गडनदी पात्रातून आठशे किलोची रांगणा तोफ एक हजार फूट खोल दरीतून गडावर आणल्यानंतर भैरी भवानी मंदिरा समोर स्थानापन्न केली. मावळा प्रतिष्ठान आणि शिवाज्ञा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी पारंपरिक आयुधांचा वापर करत रांगणा तोफ सोनगडावर आणल्यानंतर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. यावेळी मावळ्यांनी जय शिवाजी, जय भवानी… हर हर महादेव अशा घोषणा दिल्या. Source link

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1