2.2 C
pune
November 14, 2022

7 तारखेला होणार iphone 14 लॉन्च; असा पाहा संपूर्ण Apple LIVE इव्हेंट


Apple iPhone 14 Live Event : दिग्गज कंपनी Apple 7 सप्टेंबर रोजी चार नवीन iPhones (iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max) लॉन्च करणार आहे. भारतीय वेळेनुसार Apple iPhone 14 सीरिजचा लॉन्च इव्हेंट रात्री 10:30 वाजता सुरू होईल. आयफोन 12 आणि आयफोन 13 सह, कंपनीने 4 मॉडेल लॉन्च केले. iPhone 14 रेंजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असेल.

iphone14 सीरिजची किंमत किती? (Apple iPhone 14 Price) :

आयफोन iphone 14 सीरीजच्या किंमती काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे लीक झाल्या आहेत. अहवालानुसार, iPhone 14 ची किंमत $749 (59,440 रू), iPhone 14 Max ची किंमत $849 (67,376 रू), iPhone 14 Pro ची किंमत $1,049 (83,248 रू) आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1,149 (91,184 रू) आहे. मात्र, भारतात या किंमती जास्त असण्याची शक्यता आहे. आयफोन 14 आणि आयफोन 14 मॅक्समध्ये A15 बायोनिक चिप दिली जात आहे, तर इतर दोन मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिप दिली जाईल असा दावाही अहवालात करण्यात आला आहे. 

iphone14 चे फिचर्स : 

कंपनी ग्रेफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पर्पल कलरमध्ये iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max देऊ शकते. आयफोन 14 हा काहीसा आयफोन 13 सारखा दिसतो. कंपनीने iPhone 14 च्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये बदल केले आहेत. त्याच्या प्रो मॉडेलमध्ये 48 एमपी वाइड-एंगल कॅमेरासह 12MP अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे.

iphone 14 लाँच इव्हेंट कसा पाहाल? 

Apple च्या iPhone 14 सीरिजचा लॉन्च इव्हेंट कॅलिफोर्नियातील मुख्यालयात आयोजित केला जाईल, परंतु तुम्ही तो घरी बसूनही पाहू शकता. वास्तविक, Apple लॉन्च इव्हेंटचे ऑनलाइन स्ट्रीमिंग देखील करेल. Apple आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबसह वेबसाइटवर आयफोन 14 लॉन्च इव्हेंट ऑनलाइन स्ट्रीम करणार आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मला भेट देऊन लाँच इव्हेंट थेट पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या : Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1