3 C
pune
November 17, 2022

Google Pixel 7 सिरीजसह लॉन्च होणार पहिले Pixel Watch


Google Pixel 7 Series Launch Date : Google द्वारे नेहमीच वेगवेगळे इव्हेंट लॉन्च केले जातात. Google येत्या ऑक्टोबरमध्ये Pixel 7 Series लॉन्च करणार आहे. Google च्या या नवीन Pixel सीरीजमध्ये Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पण, त्याचबरोबर कंपनीने मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये Google पहिले पिक्सेल स्मार्टवॉचदेखील लॉन्च करणार आहे. 

गुगलद्वारे हा इव्हेंट 6 ऑक्टोबर रोजी लॉन्च केला जाणार आहे. या संबंधित गुगलने एक प्रोमो व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर जारी केलेल्या माहितीनुसार, हा मेड बाय गुगल (Made By Google) इव्हेंट असेल. गुगलचा हा इव्हेंट 6  ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम यूट्यूब आणि कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाईव्ह पाहता येणार आहे. 

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे फिचर्स : 

मिळालेल्या माहितीनुसार, Google Pixel 7 चा डिस्प्ले Pixel 7 Pro पेक्षा थोडा लहान असू शकतो. तर, Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंच किंवा 6.8 इंच डिस्प्ले असू शकतो. Pixel 7 Pro मध्ये LTPO OLED डिस्प्ले असेल आणि ग्राहक Quad-HD + (1440p) च्या रिझोल्यूशनचा आनंद घेऊ शकतील. Pixel 7 Pro स्मार्टफोनची स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Pixel 7 चे तीन कलर व्हेरियंट दिले जातील जे ऑब्सिडियन, लेमनग्रास आणि स्नो कलर्स असतील. Pixel 7 Pro च्या कलरबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Obsidian, Hazel आणि Snow कलर व्हेरिएंटमध्ये मध्ये उपलब्ध असेल. तसेच, हे दोन्ही स्मार्टफोन Android 13 वर काम करतील आणि दोन्हीमध्ये इन-हाउस सेकंड-जनरेशन टेन्सर चिपसेट असेल.

कसा असेल गुगलच्या पहिला स्मार्टफोन?   

गुगल येत्या ऑक्टोबरमध्ये पिक्सेल सीरिजच्या स्मार्टफोनबरोबर पिक्सेल वॉच स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत पिक्सेल वॉचची काही फोटो पाहायला मिळाली, त्यानुसार पिक्सेल वॉचमध्ये गोल डिस्प्ले आणि मेटल फ्रेमसह स्लिम बेझल्स असतील  हे स्मार्टवॉच WearOS UI वर काम करेल आणि त्यात नेव्हिगेशन आणि स्मार्ट नोटिफिकेशन्स सारखे फिचर्स देखील पाहायला मिळतील. याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फिचर्चदेखील पाहायला मिळतील.   

महत्वाच्या बातम्या :Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1