2.2 C
pune
November 15, 2022

TikTok Ban: राष्ट्रीय सुरक्षेमुळे जगभरातून TikTok वरील बंदीच्या मागणीत वाढ, अमेरिकेतही बं


TikTok Ban: Tiktok हे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म जगभर प्रसिद्ध आहे. यासोबतच ते दररोज यशाच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करत आहे, मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकचा अनेक देशांमध्ये विरोध होत आहे. याच्या विरोधामुळे अनेक देशांच्या सरकारने त्यावर बंदीही घातली आहे. भारतातही या अॅपवर बंदी आहे, आता अमेरिकेतही या अॅपवर बंदी घालण्याची मागणी होत असल्याचं वृत्त आहे. यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (USFCC) च्या एका नेत्याने Apple आणि Google ला चीनशी संबंधित डेटा सुरक्षा चिंतेमुळे अॅप स्टोअरमधून टिकटॉकचे अॅप काढून टाकण्यास सांगितले आहे.

टेक जगातील ख्यातनाम लोकांकडून चिंता व्यक्त
Axios आणि इतर वृत्तसंस्थेने नोंदवल्याप्रमाणे, TikTok बाबत टेक जगातील ख्यातनाम लोकांनी चिंता व्यक्त केली होती, सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून टिकटॉकचे जगभरात 1 अब्जाहूनअधिक युजर्स आहेत. मेटा या नावाने ट्रेडिंग केल्याने या कंपनीच्या शेअर्सची किंमत टिकटॉकमुळे कमालीची घसरली होती. फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी उघडपणे कबूल केले होते की, टिकटॉक आणि अशा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची वाढ हे त्यांच्या कंपनीच्या शेअरच्या किमती घसरण्यामागे आहे. तसेच जगातील तज्ज्ञ या अॅपच्या यशाबद्दल तक्रार करत आहेत. 

भारतात टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी

देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत मोदी सरकारने जून 2020 मध्ये टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या सीमावादापासून देशात चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने वाढत होती. सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिक्रिया टिकटॉकशी संबंधित होते. टिकटॉकवरील बंदीबाबत लोक दोन गटात विभागले गेले होते. टिकटॉक सारखे अॅप देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे होते आणि सरकारने त्यांच्यावर बंदी घालून योग्य तेच केले आहे, असे एका बाजूचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या लोकांची नोकरी आणि कलाकारांचे व्यासपीठ हिसकावले जात असल्याचे बोलले जात होते.

टिकटॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडे

अमेरिकेत लोकप्रिय होत असलेल्या टिकटॉकची मालकी चीनी कंपनी ByteDance कडे आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या कंपनीला अमेरिकेच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. FCC च्या आयुक्तांपैकी एक, ब्रेंडन कार यांनी Apple CEO टिम कुक आणि Alphabet CEO सुंदर पिचाई यांच्यासोबत ट्विटरद्वारे एक पत्र शेअर केले होते. हे पत्र TikTok ने या दोन कंपन्यांच्या अॅप स्टोअर धोरणांचे उल्लंघन केल्याच्या अहवाल आणि इतर घडामोडीकडे निर्देश करते.

पत्रात म्हटले होते, टिकटॉक हेरगिरी करते
त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, “टिकटॉक हे फक्त एक मजेदार व्हिडीओ किंवा मिम्स शेअरिंग अॅप नाही. तर TikTok हे गुप्तहेर म्हणून काम करते आणि युजर्सचा वैयक्तिक आणि संवेदनशील डेटा देखील चोरते. जर Apple आणि Alphabet ने त्यांच्या App Store वरून Tiktok काढून टाकले नाही, तर त्यांना त्यावर विधान करावे लागेल आणि त्यांच्या आणि Tiktok च्या धोरणाबद्दल देखील सांगावे लागेल. असा इशारा टिकटॉक संदर्भात देण्यात आला होता. या पत्रात, ब्रेंडन कार महिन्याच्या सुरुवातीला बझफीड न्यूजच्या अहवालाचा हवाला देत म्हटले होते की TikTok कर्मचार्‍यांच्या रेकॉर्डिंगवरून असे सूचित होते की, चीनमधील अभियंत्यांना सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान यूएस डेटामध्ये प्रवेश होता.

 

 Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1