1.1 C
pune
November 17, 2022

पॉवरफुल बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि दमदार फिचर्ससह iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च


iQOO Z6 Lite 5G Sale : तुम्हाला जर बजेटफ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. कारण iQOO Z6 Lite 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा अतिशय कमी दरात 5G सुविधा देणारा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz LCD डिस्प्ले आहे आणि 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आहे. तसेच, 18W चार्जिंग सपोर्टसह मोठ्या बॅटरीचा सपोर्ट आहे. हा स्मार्टफोनही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 13,999 आहे. मात्र, हा स्मार्टफोनची ऑफर फक्त आजपर्यंतच उपलब्ध आहे. जर तुम्ही आजपर्यंत हा स्मार्टफोन खरेदी केला तर तो तुम्हाला 11,499 रूपयांपर्यंत मिळू शकतो.   

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन iQOO India च्या ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केला जाऊ शकता. तसेच हा स्मार्टफोन अॅमेझॉनवरही उपबल्ध आहे. Z6 Lite स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये आणि 2 किमतींमध्ये उपलब्ध आहे; 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 13,999 रुपयांना आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेला स्मार्टफोन 15,499 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, Amazon वरून Z6 Lite खरेदी करण्यावर एक चांगली ऑफर आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून SBI बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला या      स्मार्टफोनवर 2500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजे Z6 Lite चे दोन्ही व्हेरिएंट ऑफर केल्यानंतर तुम्हाला 11,499 रुपये आणि 12,999 रुपये मिळतील. ही ऑफर केवळ आजपर्यंत आहे. 

iQOO Z6 Lite 5G तपशील आणि बॅटरी

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.58-इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. स्मार्टफोन दोन कलरमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम (OS) FunTouch OS UI सह Android 12 आहे. त्याची बॅटरी 5,000mAh आहे जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वाच्या बातम्या : 



Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1