7 C
pune
November 13, 2022

Vivo X Fold + फोन लवकरच होणार लॉन्च; बेस्ट फिचर्ससह मिळणार 4,600mAh ड्युअल-सेल बॅटरी


Vivo X Fold+ : Vivo X Fold + ची माहिती आधीच लीकमध्ये समोर आली आहे. हे कंपनीचे आगामी फोल्डेबल डिव्हाईस असू शकते. आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, हा फोन TENAA सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. फोनच्या बॅटरी क्षमतेची माहिती लिस्टिंगद्वारे मिळाली आहे. TENAA च्या आधी, Vivo चा हा फोल्डेबल फोन चायना 3C डेटाबेस आणि Google Play वर देखील दिसला आहे. MySmartPrice च्या अहवालानुसार, Vivo X Fold+ स्मार्टफोन TENAA सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 2,300mAh + 2,300mAh ड्युअल-सेल बॅटरीच्या समर्थनासह येईल. याशिवाय, हा फोन 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह ऑफर केला जाईल.

Vivo X Fold+ चे डिटेल्स :

बॅटरी व्यतिरिक्त, फोन Android 12-आधारित Funtouch OS 12 वर चालेल असे या सूचीतून समोर आले आहे. Vivo चा हा फोल्डेबल फोन 5G बँडच्या सपोर्टसह येऊ शकतो. याशिवाय यामध्ये N1, N28, N41, N78 आणि N79 सपोर्टही दिला जाऊ शकतो. कोणत्याही सर्टिफिकेशन साईटवर हा फोन स्पॉट होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी गुगल प्ले लिस्टमध्ये Vivo X Fold Plus नावाचा एक डिवाइस दिसला होता. हा फोन मॉडेल नंबर V2229A सह सूचीबद्ध होता.

आम्ही तुम्हाला सांगतो, फोन चायना 3C डेटाबेसवर देखील स्पॉट झाला आहे. येथे देखील फोन मॉडेल नंबर V2229A सह सूचीबद्ध आहे. इतकेच नाही तर Vivo चा हा फोल्डेबल फोन बेंचमार्किंग साईट गीकबेंच वर देखील दिसला आहे, जिथून असे समजले आहे की फोन मध्ये 2K रिझोल्युशन डिस्प्ले असेल. 120Hz रिफ्रेश दर देखील डिस्प्लेमध्ये आढळू शकतो. याशिवाय, फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो.

Vivo X Fold+ ची कॅमेऱ्याचे फिचर्स : 

फोनचे कॅमेरा फीचर्स देखील जुन्या लीकच्या माध्यमातून समोर आले होते. लीकनुसार, या Vivo फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP असू शकतो. याशिवाय फोनमध्ये 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 12MP पोर्ट्रेट सेन्सर आणि 8MP टेलिफोटो सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP सेंसर दिला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या : Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1