0.8 C
pune
September 21, 2022

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन , दिल्लीत होणार अंत्यसंस्कार

42 दिवसांची मृत्यूशी झुंज संपली. अच्छा चलता हुं दुवा मे याद रखना!!!

मुंबई -बॉलिवूडचे जगप्रसिद्ध कॉमेडियन गजोधर उर्फ राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज ऍम्स मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. गेल्या महिन्यात 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते.

हार्ट अटॅकनंतर 42 दिवसांपासून सुरू होते उपचार

राजू यांच्या हृदयात आढळले होते 100 टक्के ब्लॉकेज
11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या साऊथ एक्स येथील कल्ट जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे सर्व फॅन्स देवाला प्रार्थना करीत होते. कित्येकजण त्याला भेटुन जात होते. काही दिवांपूर्वीच ते कोमातून बाहेर आले होते आणि ते उपचारास प्रतिसाद देत होते.

बुधवारी पुन्हा अचानक त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 42 दिवस ते कोमात होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

 

बिग बींनी पाठवला होता मेसेज

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी एक खास ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये अमिताभ म्हणाले होते – उठ राजू, खूप झाले, अजून खूप काम करायचे आहे. आता उठ… आम्हा सर्वांना हसायला शिकवं.” हे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले गेले होते.भेटण्यासाठी देशभरातून लोक आले होते

राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होता. 31 जुलैपर्यंत ते सतत शो करत होता, अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते.

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

हैदराबादमधील भोईगुडा आडी येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा मृत्यू

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1