6 C
pune
September 24, 2022

अॅमेझॉनचा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होतोय


Amazon Great Indian Festival Sale 2022 : नवरात्रीचा (Navratri 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यानंतर करवा चौथ आणि मग दिवाळी असे एका मागोमाग एक सणांची यादीच लागली आहे. आता सण म्हटला की खरेदी करणं आलंच. मग ते नवीन कपड्यांपासूवन असो वा अगदी घरच्या वस्तूंपासून किंवा मग स्मार्टफोन, लॉपटॉप खरेदी करणं असो. अशावेळी प्रत्येकजण स्वस्तात मस्त खरेदी करण्याचा विचार करतो. ग्राहकांच्या याच गरजा लक्षात घेऊन अॅमेझॉनने Great Indian Festival Sale 2022 आणला आहे. अॅमेझॉनचा (Amazon Sale) सर्वात मोठा फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होतोय. या सेलमध्ये तुम्हाला सर्वाधिक सूट आणि डील्स मिळतील. Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल फोन, कपडे, ब्युटी प्रोडक्ट्स किंवा इतर कोणत्याही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी बेस्ट आहे. यावेळच्या सेलमध्ये नेमके काय खास आहे ते जाणून घ्या. 

  • अॅमेझॉनचा हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अॅमेझॉन प्राईम सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधीच सुरु होईल. या सेलमध्ये, SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सवरून 10% पर्यंत झटपट सूट उपलब्ध असेल. Amazon प्राईम सदस्यांसाठी वेगळे कूपन आणि अतिरिक्त कॅशबॅक आणि ऑफर असतील.
  • महिलांसाठी विशेष जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट्स. याच प्रोडक्ट्सवर अॅमेझॉन सेलमध्ये तब्बल 80% पर्यंत सूट मिळणार आहे आणि कपड्यांचा सेल फक्त 199 रूपयांपासून सुरु होणार आहे. तर, ब्युटी प्रोडक्ट्स फक्त 99 रूपयांपासून उपलब्ध असतील. ब्रँडेड कपड्यांचे डील देखील 399 रुपयांना उपलब्ध असेल, तसेच दागिने, लगेज बॅग आणि घड्याळे 499 रुपयांपासून सुरू होतील.

  • सध्या बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनवर देखील सर्वाधिक डील देण्यात आली आहे. अनेक नवीन लॉन्च केलेल्या स्मार्टफोनवर 40% पर्यंत सूट मिळेल. तर फोनच्या अॅक्सेसरीजची किंमत 49 रुपयांपासून सुरू होईल. तुम्ही जर बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या शोधात असाल तर अॅमेझॉन सेलवर तुम्हला अगदी 5,999 रुपयांपासून स्मार्टफोन खरेदी करता येईल. 
  • इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये 75% पर्यंत सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये लॅपटॉप, घड्याळ हेडफोन, टॅबलेटवर अनेक डील उपलब्ध असतील. 

  • घर आणि स्वयंपाकघरातील वस्तूंवरदेखील 70% पर्यंत सूट असणार आहे. घरातील वस्तूंची किंमत 49 रुपयांपासून सुरू होईल. 
  • टीव्ही आणि इतर मोठ्या गृहोपयोगी वस्तूंवर 70% पर्यंत सूट असेल आणि नवीन लॉन्च केलेले प्रोडक्ट्स देखील असतील. डीलमध्ये, वॉशिंग मशीनची किंमत 5,999 रुपयांपासून सुरू होईल. फ्रीजची किंमत 7,290 रुपयांपासून सुरू होईल. 
  • फायर स्टिक, किंडल, इको स्पीकर आणि सर्व अलेक्सा उपकरणांवर 55% पर्यंत सूट. याशिवाय, प्रत्येक सेगमेंटमध्ये नवीन लॉन्चवर नवीन लॉन्च, नवीन डील आणि डिस्काउंट उपलब्ध होणार आहेत.

टीप :  ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : Source link

Related posts

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

सॅमसंगच्या ‘या’ फोनच्या किंमतीत घसरण; काय आहे नवी किंमत अन् ऑफर्स

cradmin

सुखोई लढाऊ विमानातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1