7 C
pune
November 13, 2022

Google Pixel 7 सीरीजचे फिचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार 


Google Pixel 7 Pro : गुगल लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय. या हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. या मोबाईलमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार आहे. 

Google Pixel 7 साठी कंपनीचा स्वतःचा विकसित प्रोसेसर असेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अधिक चांगला फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत, मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. फोनच्या डिझाइनचा ब्रँडने आधीच याबाबत खुलासा केला आहे. 

Google Pixel 7 मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो, जो पूर्ण-HD + OLED स्क्रीन असेल. याचा रिफ्रेश दर 90Hz असेल. तर 6.7-इंचाचा QHD + OLED पॅनेल प्रो व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. म्हणजे Pixel 7 Pro, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
 
गुगलने दिलेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये टेन्सर जी2 प्रोसेसर उपलब्ध असेल. फोनमध्ये 12GB रॅम आणि Titan M सिक्युरिटी चिप दिली जाऊ शकते. फोटो आणि व्हिडिओसाठी 50MP फ्रन्ट कॅमेरा उपलब्ध असेल, यामध्ये 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. प्रो वेरिएंटमध्ये कंपनी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देईल, ज्यामध्ये या दोन लेन्ससह आणखी 48MP लेन्स उपलब्ध असतील. फ्रंटमध्ये कंपनी 11MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. Google Pixel 7 सीरीजमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटचा पर्याय मिळेल.

स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये 4700mAh बॅटरी असेल, तर प्रो व्हेरिएंटमध्ये कंपनी 5000mAh बॅटरी देऊ शकते. दोन्ही फोन 30W चार्जिंग सपोर्टसह येतील. हँडसेट Android 13 वर आधारित असेल.  

किंमत किती असेल? 

Google Pixel 7 ची किंमत 599 डॉरल म्हणजेच  48,600 रुपये आहे. तर  Pixel 7 Pro 899 डॉलर म्हणजे  72,900 रुपये आहे. ही किंमत लिकर्सने अंदाजी वर्तवली आहे. मोबाईल प्रत्यक्षात बाजारात आल्यानंतर या किंतीमध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकते. भारतात लॉन्च झाल्यानंतर या मोबाईलच्या किमती आणखी महाग होऊ शकता. ऍपल आणि इतर Google स्मार्टफोन्सप्रमाणे  भारतात या उपकरणांची विक्री केल्यास कर आणि इतर विविध गोष्टींची भर पडेल त्यामुळे या मोबाईलची किंमत वाढण्याची शक्यता आहे.  

महत्वाच्या बातम्या

Croma: टाटा क्रोमाची भन्नाट ऑफर,  अवघ्या 51 हजारांत मिळतोय iPhone 13! 

iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दंडSource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1