7 C
pune
November 13, 2022

पुण्यात बनली देशातील पहिली लक्झरी इलेक्ट्रिक कार, Mercedes EQS 580 मध्ये मिळणार ‘हे’ फीचर्स


Made In India Mercedes Electric Car: पुणे (Pune) हे आता जगभरात ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे प्रमुख केंद्र (Pune Top Automotive Centers Globally) म्हणून समोर येत आहे. जगभरातील अनेक मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांचे प्लांट येथे आहेत. येथील चाकण-तळेगाव पट्ट्यात जनरल मोटर्स, फोक्सवॅगन आणि महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि Mercedes-Benz सारख्या मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांचे प्लांट आहेत. यातच आता Mercedes ने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची निर्मिती Mercedes-Benz जर्मनीनंतर फक्त पुण्यात करत आहे. आगामी EQS 580 4MATIC कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स आधुनिक असण्यासोबतच स्मार्ट आहेत. यासोबतच या कारचा लूकही स्टायलिश आहे. ही कार देशातील पहिली मेड इन इंडिया लक्झरी इलेक्ट्रिक कार (Made In India Mercedes Electric Car) आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ.     

पुण्यात झाली कारची निर्मिती 

भारतीय बाजारपेठेचं महत्व ओळखून Mercedes-Benz ने ही कार देशात बनवण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे. या अपकमिंग कारची कंपनीच्या पुण्यातील चाकण (Pune, Chakan) येथील प्लांटमध्ये निर्मिती (Mercedes Electric Car Made In Pune) करण्यात आली आहे. ही देशातील पहिली स्वदेशी लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक ऑनलाइन किंवा  जवळच्या मर्सिडीज-बेंझ डीलरशिपला भेट देऊ ही कार बुक करू शकतात. Mercedes EQS 580 4MATIC ही भारतातील आतापर्यंतची सर्वात लांब रेंजची कार असले, असं बोललं जात आहे. तसेच ही पहिली ARAI-प्रमाणित लक्झरी ईव्ही (EV) असेल.

750 किमीची मिळणार रेंज? 

आगामी Mercedes-Benz EQS 580 मध्ये 107.8 kWh ची लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो. या EV ची रेंज सुमारे 750 किलोमीटर असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे ही देशातील सर्वात लांब पल्ला गाठणारी इलेक्ट्रिक कार ठरू शकते. या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास फक्त 4.1 सेकंद लागतात.

कधी होणार लॉन्च? 

मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, ही कार 30 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी भारतात याची किंमत 2.45 कोटी रुपये (एक्स-शोरूम)  ठेवू शकते.   

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Tata Tiago EV भारतात 8.49 लाखांच्या किंमतीत लॉन्च, या आहेत 10 महत्वाच्या गोष्टी

Car loan Information:
Calculate Car Loan EMISource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1