3 C
pune
November 13, 2022

शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आहे, तुम्ही प्रॉपर्टीचे वारसदार, पण आम्ही विचारांचे! : एकनाथ शिंदें

DASRA MELAVA

विजयादशमीनिमित्त उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच बुधवारी स्वतंत्र मेळावे मुंबईत आज झाले.  वांद्रे येथील बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शिवतीर्थ मैदान ठाकरेंना देण्यात राजकारण केले जात असल्याचा आरोप सुरू होता त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, मी उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कचे मैदान देण्यास विरोध केला नाही आणि हस्तक्षेपही केला नाही. ‘मविआ’ सरकार असताना शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दावणीला बांधली गेली होती. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे होता. सत्ता असतानाही शिवसेनेच्याच आमदारांची गळचेपी केली जात होती. आम्हाला मैदानापेक्षा शिवसेनेचा विचार महत्वाचा आहे.

शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. ती एकनाथ शिंदेंचीही नाही. ती फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आहे. शिवसेना तमाम शिवसैनिकांची आहे. सत्तेसाठी आम्ही लाचारी पत्करली नाही, सत्तेपेक्षा आम्हाला सत्य आणि सत्त्व महत्वाचे आहे. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक आहोत. बाळासाहेबांचे खरे वारसदार विचार जपणारे आहोत. वारसा आम्ही जपला. विचारांचे पाईक आणि शिलेदार आम्हीच आहोत.  गद्दारी झाली हे मान्य करतानाच ती 2019 ला बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. राज्यातील मतदारांची बेईमानी केली. भाजपसोबत युती करुन नंतर गद्दारी केली. राष्ट्रवादी-काॅंग्रेससोबत सरकार स्थापन करून गद्दारी केली असा घणाघात सीएम शिंदेंनी केली. लोकांच्या मताला नाकारत सरकार स्थापन केले म्हणून ठाकरेच गद्दार आहे.

आम्ही गद्दार नाही गदर आहोत. गदर म्हणजे क्रांति, आम्ही क्रांती केली. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणतात. पण बापाच्या विचारांशी गद्दारी कुणी केली असा सवाल करीत शिंदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

एकनाथ शिंदेंनी हिंदुत्व आणि सत्तेबाबत ठोस भूमिका मांडली ते म्हणाले, आम्ही खरे हिंदुत्व जोपासतो. पण सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व ठोकरले, सत्तेसाठी ठाकरे गट हपापलेला होता. याकूब मेमनने मुंबईचा बाॅम्बस्फोट घडवले. त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तीच शिक्षा रद्द करणाऱ्या वकीलाला आमदारकी दिली जाते. ज्यांच्या नावाशिवाय आपण शुन्य आहोत, त्या बाळासाहेबांच्या हिुंदुत्वाच्या भुमिकेला उद्धव ठाकरेंनी सोडले ते सत्तेसाठी गद्दार कोण? आम्ही नाही तुम्हीच गद्दार. सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली.

एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आमदारांसोबत राज्यातील जनतेची ईच्छा भाजपसोबत जाण्याची होती. परंतु ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले. तेथे शिवसेना आमदारांची कुचंबना सुरु होती. उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या नेत्यांचेच ऐकत होते. राज ठाकरे, नारायण राणे उद्धव ठाकरेंना का सोडून गेले. याचा विचार आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

शिवसेना देशभक्त, राष्ट्रभक्तांची आहे. देशविरोधी काम करणाऱ्यांना ठेचून काढू. पीएफआयबाबत ठोस आम्ही भूमिका घेतली. देशाच्या एकात्मतेला , अखंडत्वाला नख कुणी लावले तर सोडणार नाही. पीएफआयने देशाची सुरक्षितता धोक्यात आणली तरीही ते एक शब्द बोलले नाही. भूमिका घेतली नाही.काश्मिरमधील 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हटवले. राम मंदीर बनवण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. ते स्वप्न बाळासाहेबांचे होते.` ते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले“

 शिंदेनी आरएसएसचे आजच्या भाषणात कौतूक केले. ते म्हणाले, देशाच्या उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे मोलाचे योगदान आहे. देशात काॅंग्रेसची अवस्था काय आणि ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था काय? , काँग्रेसला अध्यक्ष मिळत नाही आणि शिवसेनेकडे अध्यक्ष आहे पण सेना नाही.

 

Related posts

होणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं

cradmin

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1