1.3 C
pune
November 14, 2022

पुण्यात पेपर विक्रेत्याला जिवे मारण्याचा प्रयत्न: दोघांना अटक; तर एक अल्पवयीन मुलगा ताब्यात

 

खडकी- नितीन शिंदे यांचे खडकी बाजार येथील पोलिस लाईनच्या शेजारी पेपर विक्रीचे दुकान आहे. शिंदे दुकानात असताना अटक आरोपींनी दुकानात येऊन “तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुला जिवेठार मारू, अशी अशी धमकी देऊन पेपर विक्रेत्यावर कोयत्याने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे .

भारत उर्फ रिकी निलकंठ सारवान (वय 32) आणि चेतन गणेश मुनियार (वय 25, दोघे. रा. खडकी बाजार) तर एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. याप्रकरणी नितीन मनोहर शिंदे (वय 40, रा. खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन शिंदे यांचे खडकी बाजार येथील पोलिस लाईनच्या शेजारी पेपर विक्रीचे दुकान आहे. शिंदे दुकानात असताना अटक आरोपींनी दुकानात येऊन “तुला इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील. नाहीतर तुला जिवेठार मारू, अशी धमकी दिली.

मात्र, शिंदे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्याजवळील लोखंडी हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी वार चुकविल्यावर आरोपीने चॉपरने पाठीवर वार करत दुकानातील दोन हजार रूपये जबरदस्तीने नेले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर कदम हे करीत आहे.

पावणे दोन लाखांचा एवज जप्त

पुणे शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, बंद फ्लॅटची माहिती घेऊन चोरटे घरफोडी करत असल्याच्या घटना शहरात दररोज उघडकीस येत आहे. धानोरी येथील गोकुळनगर परिसरात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून पावणे दोन लाख रूपयांचा एवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जगजितसिंग बांगर (वय 68, रा. गोकुळनगर, धानोरी,पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्या दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त दहा दिवसांसाठी हैदराबादला गेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील पावणेदोन लाखांचे दागिने चोरून नेले. फिर्यादी हैदराबादहून आल्यावर घरफोडी झाल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सातपुते करीत आहे. तसेच बाणेर येथील सहविद्याबगर सोसायटीतील तारेच्या कंपाऊंटवरून आत येऊन चोरट्यांनी बंगल्याच्या परिसरात असलेले चंदनाचे झाड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रेमा गजराजन (वय 80) यांनी चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत…

Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1