3 C
pune
November 13, 2022

व्हिडीओ कॉल दरम्यान फोन हॅक करणाऱ्या बग्सपासून वाचण्यासाठी करा व्हॉट्सअॅप अपडेट!


WhatsApp Bug: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) सतत स्कॅम आणि हॅकिंग हल्ल्यांचा धोका वाढला आहे. हॅकर्स आणि सायबर हल्लेखोर वापरकर्त्यांच्या डेटाला हानी पोहोचवण्यासाठी नवनवीन मार्ग वापरत आहेत. दरम्यान सरकार आणि अॅपकडून अधिकृतरित्या सतत नवीन सूचना जारी केल्या जात आहेत. नुकताच व्हॉट्सअॅपमध्ये असेच दोन ‘बग’ (WhatsApp Bugs) अर्थात त्रुटी आढळल्या होत्या. या बग्सना आता व्हॉट्सअॅप दुरुस्त केले आहे. यामुळे वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात आला होता. यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे.

भारताच्या सायबर सुरक्षा निरीक्षण संस्थेच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) एक सूचना जारी केली होती. त्यात असे सांगण्यात आले होते की, या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक बग आढळले आहेत, ज्याचा हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो. यावेळी व्हॉट्सअॅप त्याच्या अपडेट्समुळे नव्हे तर सुरक्षेच्या कारणांमुळे चर्चेत आहे.

WhatsApp ही जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग सेवा आहे. सुमारे दोन अब्ज वापरकर्ते व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. त्यापैकी सर्वाधिक 48.7 कोटी भारतात आहेत. तर, त्यानंतर अनुक्रमे 118 दशलक्ष आणि 84 दशलक्ष वापरकर्त्यांसह ब्राझीलचा दुसरा आणि इंडोनेशियाचा तिसरा क्रमांक लागतो. म्हणूनच वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे.

‘क्रिटिकल’ म्हणून चिन्हांकित

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी, CERT-In ने दोन हाय सिक्युरिटी बग्सबाबत सूचना जारी केली होती. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास यूजर्सचे अकाउंट हॅक होऊ शकते. हॅकर्स रिमोट अॅक्सेससाठी वापरकर्त्याचा मोबाईल वापरू शकतात. WhatsApp च्या अंतर्गत सुरक्षेने CVE-2022-36934 आणि CVE-2022-27492 हे दोन बग शोधून काढले आहेत. व्हॉट्सअॅप या बग्सना ‘क्रिटिकल’ म्हणून चिन्हांकित केले आहे. व्हॉट्सअॅपचे हे दोन्ही बग अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही अॅपच्या वापरकर्त्यांना प्रभावित करू शकतात.

अॅप अपडेट करण्याचा सल्ला

WhatsApp मधील ‘CVE-2022-36934’ या बगद्वारे हॅकर्स व्हिडीओ कॉलद्वारे या वापरकर्त्याचा डेटा चोरी करू शकतात आणि रिमोटद्वारे कमांड देऊ शकतात. हा बग वापरकर्त्याच्यादृष्टीने अतिशय धोकादायक असून याला 10 पैकी 9.8 इतके रेटिंग देण्यात आले आहे. याला त्याच वेळी, WhatsApp मधील ‘CVE-2022-27492’ या बगद्वारे देखील हॅकर्स केवळ व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वापरकर्त्याचा डेटा चोरी करून सायबर फ्रॉड करू शकतात. अशा बग्सपासून स्वतःच्या माहितीचे आणि फोनचे संरक्षण करण्यासाठी, WhatsApp वापरकर्त्यांना अॅप अपडेट करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1