1 C
pune
November 12, 2022

आता इंटरनेटशिवाय पाहता येणार Netflix, Amazon Prime; Jio, Airtel ची होणार सुट्टी


Dot D2M Plan For Direct Broadcast : बऱ्याचदा इंटरनेटवर व्हिडीओ पाहताना बफरिंगचा सामना करावा लागतो. व्हिडीओ पाहताना आलेला हा व्यत्यय चिडचिड करुन देणारा ठरतो. पण, जर तुम्हाला इंटरनेटशिवाय थेट व्हिडीओ आणि तेही कोणत्याही बफरिंगशिवाय पाहता आले तर? हो… एअरटेल, जियो किंवा वोडाफोन कोणत्याची टेलिकॉम कंपन्यांच्या इंटरनेट पॅकशिवाय Netflix, Amazon Prime सारख्या कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहू शकणार आहेत. त्यासाठी दूरसंचार विभाग एका नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. 

दूरसंचार विभाग (DoT) नवीन “डायरेक्ट टू मोबाईल” (D2M) तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं इंटरनेटशिवाय व्हिडीओ ऑनलाईन पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच, मोबाईल फोन इंटरनेटशिवाय FM प्रमाणेच नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) यासारख्या OTT प्लॅटफॉर्मशी थेट कनेक्ट केला जाऊ शकतो. यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. जाणून घेऊया सरकार नेमकी कोणतं तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत आहे, त्याबाबत सविस्तर… 

कसं काम करणार D2M टेक्नॉलॉजी?

या तंत्रज्ञानातंर्गत व्हिडीओ आणि इतर इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँडवर जोडल्या जातील. प्रसार भारतीनं ‘डायरेक्ट-टू-मोबाइल’ (D2M) तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी गेल्यावर्षी IIT कानपूरसोबत भागीदारी केली होती. यामध्ये 526-582 मेगाहर्ट्झ बँड वापरता येईल. दूरसंचार विभागानं यासाठी एक समिती स्थापन केली आहे. 

नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर Jio, Airtel आणि Vi ची सुट्टी होणार?

D2M तंत्रज्ञान आल्यानंतर रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्ही (VI) सारख्या दूरसंचार कंपन्यांची सुट्टी होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जरी नवीन तंत्रज्ञान आलं तरी, जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या टेलिकॉम कंपन्यांना पूर्णपणे सुट्टी मिळणार नाही. फक्त ऑनलाइन व्हिडीओ पाहण्यासाठी JIO, AIRTEL आणि VI वर युजर्सचं अवलंबून राहणं काहीसं कमी होईल.

इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्यात भारत अव्वल 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडीओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 दशलक्ष मिनिटांचे व्हिडीओ प्रवाहित किंवा डाऊनलोड केले जातात. दर महिन्याला अंदाजे 240 टेक्साबाईट डेटा वापरला जातो.

नव्या तंत्रज्ञानाचा फायदा काय?

“कन्व्हर्ज्ड डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) नेटवर्कमुळे तुम्हाला बफरिंगशिवाय अमर्यादित व्हिडीओ पाहता येणार आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग आणि दिशा बदलेल. D2M नेटवर्कमध्ये, ब्रॉडकास्टर्स अशा डेटा पाईप्सचा वापर करू शकतात आणि पारंपारिक टीव्हीव्यतिरिक्त इतर अॅप्लिकेशन्स डिलिव्हर करु शकतात.” डायरेक्ट-टू-मोबाईल आणि 5G ब्रॉडबँडमधील समन्वय भारतातील ब्रॉडबँडचा वापर आणि स्पेक्ट्रमचा वापर सुधारण्यास मदत होईल. Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1