December 16, 2022

Death Prediction : तुमच्या मृत्यूची भविष्यवाणी करणार ‘हे’ तंत्रज्ञान


Death Prediction Test : भविष्य (Future) जाणून घेण्यासाठी अनेक जण आतूर असतात. आपल्याला भविष्यात काय घडणार आहे, याची माहिती मिळाली तर, असा विचार तुम्हीही बालपणात नक्कीच केला असेल. आता तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील (England) विद्यापीठाने भविष्यासंदर्भात संशोधन केलं आहे. यामध्ये तुमचा मृत्यू कधी होणार (Death Prediction) आहे हे समजण्यासाठी संशोधन केलं आहे. या विद्यापीठाने दावा केला आहे की, याद्वारे तुम्हाला कळेल की तुमचा मृत्यू कधी होणार आहे. ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठाने (University of Nottingham) 40 ते 69 वयोगटातील सुमारे 1000 लोकांवर मृत्यूच्या अंदाजाबाबत संशोधन केलं आहे.

इंग्लंडमधील (England) नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने मृत्यूच्या अंदाजावर संशोधन करत मोठं यश मिळवलं आहे. नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने नुकतेच डेथ प्रेडिक्शनवरील संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे, हे आता कळू शकते. अहवालानुसार, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे कळू शकेल की कोणाचा मृत्यू कधी होणार आहे?

नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने ब्रिटनमधील 40 ते 69 वयोगटातील सुमारे एक हजार लोकांवर मृत्यूच्या अंदाजाबाबत संशोधन केलं आहे. हे लोक मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या समस्यांनी त्रस्त होते. संशोधनात या लोकांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं. AI (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने या लोकांची प्रकृती कधी बिघडते किंवा त्यांचा मृत्यू कधी होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?

News Reels

  

AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI – Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.

या टेस्टद्वारे अकाली मृत्यूची माहिती मिळेल

या संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने मानवाचा मृत्यू कधी होईल याची माहिती मिळवता येऊ शकते. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, विशिष्ट परिस्थितीत मानवाच्या मृत्यूचा अंदाज समजू शकला, तर ज्या रुग्णांचा मृत्यूजवळ आला आहे, हे समजेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून केवळ अकाली मृत्यूबद्दल माहिती मिळवता येऊ शकते, पण नैसर्गिक मृत्यूबद्दल काहीही सांगता येणार नाही.

‘ही’ चाचणीत कशी असेल?

शास्त्रज्ञांच्या मते, मृत्यूची भविष्यवाणी करण्याची चाचणी ही रक्त तपासणीसारखीच (Blood Test) असेल. या चाचणीद्वारे काही निष्कर्ष पाहून पुढील दोन ते पाच वर्षांत रुग्णाचा मृत्यू होईल की नाही हे तज्ज्ञ सांगू शकतील. मात्र, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, या संशोधनातील दावे किती खरे ठरतात आहेत, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही.Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1