0.5 C
pune
December 15, 2022

ट्विटरने लॉन्च केली ‘गोल्ड टिक’, फक्त यांनाच मिळणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती


Twitter Gold Tick: ट्विटरने बिझनेस ब्रँड्ससाठी गोल्ड व्हेरिफिकेशन चेकमार्क लॉन्च केले आहे. सोमवारपासून (12 डिसेंबर) ब्रँड प्रोफाइलला नवीन टिक मार्क देण्यात आले आहेत. ट्विटरचे पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात ते थांबवण्यात आले होते. याची किंमत अजूनही महिन्याला 8 डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु आता Apple डिव्हाइसवर Twitter अॅप वापरणाऱ्यांसाठी 11 डॉलर्स सबस्क्रिप्शन चार्ज घेण्यात येणार आहे.

ट्विटरने गोल्ड टिक (Twitter Gold Tick) ही कंपन्यांसाठी लॉन्च केली आहे. तर ग्रे टिक राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क  (Elon Musk) यांनी आपल्या आधीच्या ट्विटमध्ये (Twitter) म्हटले आहे की, आयफोन मोबाईलमध्ये अॅप (App) खरेदीवरील अॅपलच्या (Apple) कमिशन फीला त्यांचा विरोध आहे. Twitter Blue च्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये एडिट बटण समाविष्ट आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांची एडिट पर्याय उपलब्ध करून देण्याची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. यात काही वापरकर्त्यांचं म्हणणं आहे की, मोठ्या प्रमाणात शेअर केल्यानंतर ट्वीट बदलल्यास चुकीची माहिती पसरण्याची शक्यता वाढेल. ट्विटचे म्हणणे आहे की, ब्लू-टिक सदस्यांना कमी जाहिराती दिसतील. त्यांचे ट्वीट इतरांपेक्षा वेगळे असतील. तसेच ते हाय क्वालिटी व्हिडीओ पोस्ट करू शकतील आणि पाहू शकतील. 

आधी ब्लू टिक्सचा वापर प्रामाणिकतेचा बॅज म्हणून हाय-प्रोफाइल अकाउंट व्हेरिफिकेशन म्हणून केला जात होता. ट्विटरने (Twitter) हे मोफत दिले होते. मात्र ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांचे म्हणणे आहे की, हे योग्य नाही. यानंतर त्यांनी पेड-फॉर व्हेरिफिकेशन फीचरची घोषणा केली. ज्यावर अनेक वापरकर्त्यांची नाराजी देखील व्यक्त केली.  

दरम्यान, इलॉन मस्क  (Elon Musk)  यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस ट्विटरचा (Twitter) ताबा घेतल्यापासून कंपनीत अनेक बदल केले आहेत. कंपनी दररोज 4 मिलियन डॉलर्सच्या तोट्यात चालत असून कंपनी फायद्यात आणण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचं ते म्हणाले आहेत. म्हणूनच ब्लू टिक पेड  (Blue Tick)  केले गेले आहे, म्हणजेच वापरकर्त्याला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील.

News Reels

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन कारला मिळाली 5 स्टार सुरक्षा रेटिंग, आनंद महिंद्रा यांनी टीमचं केलं कौतुक

 

 Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1