1.9 C
pune
January 3, 2023

देशभरात Jio Fiber इंटरनेट सेवा ठप्प; सर्व्हर डाऊनमुळे यूजर्सना फटका


Jio Server Down : संपूर्ण भारतात रिलायन्स जिओचं सर्व्हर डाऊन आहे. बुधवारी (आज) सकाळी यूजर्सना इंटरनेट वापरण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाऊनडिटेक्टरवर जिओ डाऊन खूप जास्त दाखवत आहे. नेटकऱ्यांनी Downdetector वर तक्रार केली आहे. ट्विटरवर जिओ डाऊनचा टॅगही दिसत आहे. मात्र, नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. 

DownDetector च्या ग्राफनुसार, सकाळी 09.30 वाजल्यापासून जिओचे सर्व्हर डाऊन आहे. 11 वाजता स्पाईक हाय होता. म्हणजेच इंटरनेट सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. तरीही सुमारे 400 यूजर्सनी डाऊनडिटेक्टरवर तक्रारी नोंदविल्या आहेत. ट्विटरवरही JioDown ट्रेंड करत आहे.

 

live reels News Reels

‘या’ शहरांमध्ये सर्व्हर डाऊन 

Jio Fiber चे सर्व्हर अनेक मोठ्या शहरांमध्ये डाऊन आहे. यामध्ये मुंबई, चंदीगड, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता यांसह अनेक शहरांचा समावेश आहे. Jio टीम सर्व्हर समस्या सोडविण्यासाठी काम करत आहेत आणि काही तासांत सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. असे सांगण्यात येत आहे. 

यूजर्सकडून संताप व्यक्त 

जिओचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेकांचे काम ठप्प पडले आहे. तसेच, अनेक यूजर्सने या संदर्भात तक्रार केली आहे. यामध्ये एका यूजरने लिहिले, ‘माझे जिओ इंटरनेट काम करत नाही. सकाळपासून मला खूप त्रास होतोय. तर, दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘जिओ फायबर काम करत नाही. राऊटरमध्ये ग्रीन सिग्नल ऐवजी रेड सिग्नल आहे. जिओची इंटरनेट सेवा मोबाईलवर सुरु आहे. मात्र, लॅपटॉप आणि टीव्हीवर नेटवर्क डाऊन आहे.   

महत्त्वाच्या बातम्या : 

Whatsapp : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी मोठी बातमी; तुमच्याकडे यापैकी कोणताही फोन असेल तर तुम्ही ‘हे’ अॅप वापरू शकणार नाही

Source link

Related posts

हिवाळ्यात तुमचा स्मार्टफोन वारंवार गरम होत आहे का? मग सावध व्हा! तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

cradmin

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1