- पहिल्या व्हिडिओमध्ये सुधीर तोल जात असलेल्या सोनालीला सपोर्ट करताना
- दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सोनालीसोबत डान्स करताना
- तिसऱ्या व्हिडिओमध्ये सुधीर सोनालीला जबरदस्तीने काहीतरी प्यायला लावताना दिसत आहे
हिस्सारमधील भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाटला PA सुधीरने जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजले होते. एका नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुधीर सोनालीच्या तोंडात जबरदस्तीने बाटली घालताना दिसत आहे. हे फुटेज क्लब ऑफ गोव्याचे असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली डान्स करताना दिसत आहे.
सोनाली फोगाटचा हा तिसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती पीए सुधीर सांगवानसोबत दिसत आहे. सर्व व्हिडिओ गोव्यातील आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये सुधीर तोल जात असलेल्या सोनालीला सपोर्ट करताना दिसत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सोनालीसोबत डान्स करताना दिसत होते, ज्यामध्ये सोनाली कम्फर्टेबल दिसत नव्हती. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये सुधीर सोनालीला जबरदस्तीने काहीतरी प्यायला लावताना दिसत आहे.
सोनाली फोगाट खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी हरियाणाला जाणार असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले आहे. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी सोनालीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सुधीर सांगवान याने तीन वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान सुधीरने व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओच्या आधारे सुधीर सोनालीला ब्लॅकमेल करायचा. सोनालीने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास सुधीरने तिचे करिअर खराब करण्याची धमकी दिल्याचा आरोप सोनालीच्या कुटुंबीयांनी केला होता. या तक्रारीत किती तथ्य आहे? याचा तपास करण्यासाठी गोवा पोलीस हरियाणा येथे जाणार आहेत. हिसार येथील सोनालीच्या घरीही पोलीस जाऊ शकतात.
सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सोनालीचे कुटुंबीय चंदीगडला रवाना
मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भेटण्यासाठी सोनालीचे कुटुंबीय चंदीगडला रवाना झाले आहेत. हे लोक हिसारहून चंदीगडला रवाना झाले आहेत आणि आज रात्री ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. सोनालीच्या कुटुंबीयांनी लेखी मागणी केल्यास राज्य सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास तयार असल्याचे खट्टर यांनी आधीच सांगितले आहे.