-1.3 C
pune
November 29, 2022

GoPro Hero 11 Black कॅमेऱ्यात आहेत भन्नाट फिचर्स; वाचा संपूर्ण माहिती


GoPro Hero 11 Black : GoPro ने Hero 11 सीरिजमध्ये दोन नवीन अॅक्शन कॅमेरे लाँच केले आहेत. जे Hero 11 Black आणि Hero 11 Black Mini आहेत. Hero 11 Black ही कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. ज्यामध्ये काही नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. भारतात Hero 11 Black ची किंमत 51,500 आहे. ही किंमत Hero 10 Black च्या तुलनेत स्वस्त आहे. Hero 10 Black अजूनही भारतात कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Hero 11 Black 10 मीटर खोल पाण्यातही काम करणार

डिझाईनच्या बाबतीत, नवीन GoPro Hero 11 Black Hero 10 Black सारखाच आहे. नवीन GoPro 11 Black हे वॉटरप्रूफ बनवण्यात आले आहे आणि ते 10 मीटरपर्यंत सहजतेने ऑपरेट करू शकते. याला मागील बाजूस 2.27-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि समोर एक छोटा, नॉन-टच कलर डिस्प्ले मिळतो. फ्लॅप बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टच्या सपोर्टसह 11 ब्लॅक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.

हिरो 11 ब्लॅकमध्ये एन्ड्युरो बॅटरी आहे, जी आधी हिरो 10 ब्लॅकसाठी स्वतंत्रपणे विकली गेली होती. कंपनीचा दावा आहे की, या बॅटरीच्या मदतीने 38 टक्के जास्त रेकॉर्डिंग करता येईल. Hero 10 Black ने गेल्या वर्षी GP2 नावाचा नवीन प्रोसेसर सादर केला होता आणि या वर्षी Hero 11 Black मध्ये एक मोठा आणि नवीन सेन्सर जोडला गेला आहे. 

4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधा : 

मोठ्या सेन्सरच्या मदतीने, GoPro Hero 11 Black चा वापर 27-मेगापिक्सेल क्षमतेच्या कॅमेऱ्याप्रमाणे फोटो घेण्यासाठी केला जाऊ शकतो. GoPro Hero 11 Black ला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी नवीन हायपरव्ह्यू लेन्स मिळतात जे सुपरव्ह्यू लेन्सपेक्षा मोठे क्षेत्र व्यापते. GoPro Hero 11 Black वर कमाल व्हिडिओ रेकॉर्डिंग रिझोल्यूशन Hero 10 Black प्रमाणेच आहे, जे 60fps वर 5.3K किंवा 120fps वर 4K आहे.  

GoPro Hero 11 Black चा सेटिंग्ज मेनू पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. नवीन व्हिडिओ मोड सेटिंग तुम्हाला बॅटरी मोड बंद करण्याची परवानगी देते, जे डीफॉल्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रीसेट कमी रिझोल्यूशनमध्ये बदलते.

महत्वाच्या बातम्या : Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1