-8.3 C
pune
November 27, 2022

Instagram : इंस्टाग्रामचं नवं फिचर, आता पोस्ट आणि रील्ससाठी QR Code


Instagram QR Code : मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं (Instagram) नवं फिचर आणणार आहे. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या प्रचंड आहे. तरूणाईमध्ये इंस्टाग्रामची प्रचंड क्रेझ आहे. याच यूजर्ससाठी इंस्टाग्राम सतत नवीन फिचर अपडेट करत असते. इंस्टाग्रामने पोस्टसाठी क्यूआर कोड (QR Code) हे नवीन फिचर आणणार आहे. तुम्ही आता पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशनसाठी QR Code बनवू शकता. यामुळे इंस्टाग्राम युजर्स आता QR कोडद्वारे त्यांची पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशन्स शेअर करु शकतील.

इंस्टाग्रामवरील युजर्ससाठी आता QR कोड शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही रील्स, पोस्ट किंवा लोकेशनवरील थ्री-डॉट मेनूवर क्लिक करायचे आहे. यामध्ये वरच्या बाजूला उजवीकडे ‘QR कोड’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तो तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करु शकता. तुम्ही QR कोड जनरेट करण्यासाठी ब्राउझरवरील पोस्टच्या URL मध्ये ‘/qr’ लिहून देखी क्यूआर कोड जनरेट करु शकता.

Instagram च्या या नवीन फीचरमुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाइलच्या QR कोडद्वारे प्रोफाइल शेअर करण्याची परवानगी मिळेल. याशिवाय तुम्हाला तुमची पोस्ट, रिल्स किंवा लोकेशन क्यूआर कोडमुळे शेअर करणं सोपं होईल, असं इंस्टाग्रामने म्हटलं आहे. इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीने सांगितले की त्यांनी ‘लोक आणि व्यवसायांना विशिष्ट कंटेट सर्च किंवा अॅड करणे सोपे करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. 

इंस्टाग्रामवर आता लोकेशन शोधणं सोपं

इंस्टाग्रामने याआधही एक नवीन फिचर अपडेट केलं आहे. या नवीन फिचरमध्ये नकाशा जोडण्यात आला. हे नवीन फिचर गुगल मॅपसारखेच (Google Map) दिसत असले तरी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाचे (Meta) मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी प्लॅटफॉर्मवर शोधण्यायोग्य नकाशा दर्शविण्यासाठी एक इंस्टाग्राम स्टोरी देखील पोस्ट केली आहे. या नवीन फिचर्ससह असे दिसते की, यूजर्स त्यांच्या जवळील लोकप्रिय ठिकाणं जसे की हॉटेल्ससुद्धा शोधू शकतात आणि श्रेणीनुसार फिल्टर देखील वापरू शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्याSource link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1