-1.3 C
pune
November 29, 2022

विरारमधील ह्रदयद्रावक घटना: गरबा खेळताना मुलाचा मृत्यू ,धक्का बसल्याने वडिलांनीही सोडले प्राण,

नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळताना मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकून वडिलांचाही धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना विरारमधून समोर आली आहे. मनीष जैन आणि नरपत जैन अशी मृत्युमुखी पडलेल्या पुत्र आणि पित्याचे नाव आहे.

गरबा खेळतानाच ह्रदयविकाराचा झटका
याविषयी सविस्तर वृत्त असे की, विरारमधील ग्लोबल सिटीत राहणारा मनीष जैन हा युवक बिल्डिंगच्या आवारात गरबा खेळत होता. यावेळी अचानक त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचाही मृत्यू
डॉक्टरांनी मनीषला मृत घोषित केल्यानंतर वडिल नरपत जैन यांना याचा धक्का असह्य झाला आणि त्यांनाही ह्रदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांचाही धक्क्याने जागेवरच मृत्यू झाला. पिता-पुत्राच्या मृत्यूच्या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
वाशिममध्येही अशीच घटना
गरबा खेळताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची अशीच एक घटना वाशिममध्येही घडली आहे. येथील कारंजा लाडमधअये महेश भवनमध्ये 30 सप्टेंबर रोजी गरबा खेळणाऱ्या युवकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता

 

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1