-7.1 C
pune
January 26, 2023

नाशिक मध्ये चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण आग, आगीत 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यु 38 जखमी

नाशिक बसला आग

नाशिक: महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी भयंकर दुर्घटना घडली असून या खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ”या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.”
तर इतर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यवतमाळहून ही बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. नाशिकमधून ही बस मुंबईच्या दिशेने येत असताना बस आणि ट्रेलर ट्रकचा अपघात झाला. मिर्ची हॅाटेल जंक्शनवर झालेल्या अपघातात लक्झरी बसची ट्रकच्या केबीनच्या मागे धडक बसल्याने बसने पेट घेतला असल्याची माहिती आहे.

ही यवतमाळ वरुन मुंबईला जाणारी खासगी बस असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
ही बस स्लीपर कोच होती.

दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. नेमकं काय घडलं?

 

Related posts

होणाऱ्या पतीने न्यूड फोटो पोस्ट केल्याने तिने असा घेतला बदला, संपूर्ण शहर हादरलं

cradmin

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1