-1.1 C
pune
December 1, 2022

Internet Speed In India: भारतात इंटरनेटचा वेग मंदावतोय; जगात पहिल्या 100 देशांतही समावेश नाही


Internet Speed In India: भारतात एकीकडे 5 जी इंटरनेटची (5G Internet) उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 5 जी इंटरनेटमुळे देशातील मोबाइल इंटरनेटमध्ये (Mobile Internet) क्रांती येईल असे दावे केले जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला भारतात सध्या वापरात असलेल्या इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावला असल्याचे समोर आले आहे. वेगवान इंटरनेट असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशांतही भारताचा (Internet Speed In India) समावेश नाही. ग्लोबल स्पीड टेस्ट एजन्सी Ookla ने इंटरनेट स्पीडबाबत एक अहवाल जारी केला आहे. 

या अहवालानुसार, भारतात इंटरनेटचा वेग पूर्वीच्या तुलनेत सध्या कमी झाला आहे.  ग्लोबल इंटरनेट स्पीडच्या यादीत ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारताची पिछेहाट झाली आहे. ब्रॉडब्रॅण्ड आणि मोबाइल इंटरनेट या दोन्हीच्या वेगात भारताची घसरण झाली आहे. 

सप्टेंबर महिन्यात ब्रॉडब्रॅण्ड वेगाबाबत भारत 117 व्या स्थानाहून 118 व्या स्थानावर आला आहे. तर, मोबाइल इंटरनेट स्पीडबाबत भारत 78 व्या स्थानावरून  79 व्या स्थानावर आली आहे. 

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात भारतातील मोबाइल डाउनलोड स्पीड चांगला झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोबाइल डाउनलोड स्पीड 13.52Mbps इतका होता. सप्टेंबर महिन्यात यात वाढ होऊन तो 13.87Mbps इतका झाला.

ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेटचा स्पीडमध्ये सप्टेंबर महिन्यात वाढ झाली. ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट स्पीड हा 48.29Mbps हून 48.59Mbps इतका झाला. 

इंटरनेट स्पीडमध्ये हा देश अग्रसेर

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे देश पहिल्या स्थानावर आहे. मोबाइल इंटरनेटचा स्पीड नॉर्वेमध्ये सर्वाधिक आहे. एकूण ब्रॉडब्रॅण्ड स्पीडबाबत चिली अग्रसेर आहे. Ookla कडून दर महिन्याला इंटरनेट स्पीडचा डेटा जारी करण्यात येतो. हा डेटा लोकांकडून करण्यात येत असलेल्या Speed Test च्या आधारे तयार केला जातो.   

5 जी कडून आशा 

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत हा सध्या इतर देशांच्या तुलनेत बराच मागे आहे. देशात सर्वाधिक 5जी नेटवर्क लाँच केले आहे. मात्र, 5 जी इंटरनेट सध्या मोजक्याच शहरात उपलब्ध होणार आहे.  5जी इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. तर, ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेट स्पीडमध्ये भारत बराच मागे आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:Source link

Related posts

हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला… : उद्धव ठाकरे यांचा विरोधकावर हल्लाबोल

cradmin

सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी?

cradmin

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म-डिजीटल न्यूज करार; भारताने ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून शिकावे; DNPA परिसंवाद

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1