-4 C
pune
January 25, 2023

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ,मराठी चित्रपटसृष्टीत असा नट पून्हा: होने नाही!

vg

विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत]ला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली आहेत.

आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

 

 

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला.विक्रम गोखले यांना घरातून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी 71 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली आहे. चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटर यांनी त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. विक्रम गोखले यांनी पाच वर्ष बाळ कोल्हटर यांच्यासोबत काम केलं. विजया मेहता यांच्या बॅरिस्टर या नाटकामध्ये काम केलं. विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक हे स्वामी होतं. या नाटकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. नकळत सारे घडले, महासागर, समोरच्या घरात या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी , सिंहासन या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि चित्रपटातील कालाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत देखील त्यांनी एन्ट्री केली होती. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी या मालिकेमध्ये काम केले. या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली.

गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मधुमेह आणि जलोदर झाल्यामुळे उपचार सुरू होते. परंतु उपचारांना प्रतिसाद देणे हळूहळू बंद झाले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.​​​​ ​​​गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याचे वृत्त होते. मात्र आज सकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात आले होते.. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते व्हेंटिलेटवर होते.

विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासह जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे हे कलाकार दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी विक्रम गोखले रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून सुटी मिळताच त्यांनी गोदावरी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची पावती मिळाला आहे.

अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते. यापूर्वी अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ते या मालिकेत दिसले होते.

 

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा

तीनही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

`ऐश्वर्या रायच्या वडिलांची साकारली होती भूमिका

संजय लीला भन्साळींच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटात विक्रम गोखले यांनी ऐश्वर्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी भूल भुलैया, दिल से, अग्निपथ, दे दना दान, हिचकी, निकम्मा आणि मिशन मंगल या चित्रपटांमध्येही काम केले.’उडान’ या टेलिव्हिजन शोमध्येही काम केलेविक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. 1989 ते 1991 या काळात दूरदर्शनवर चाललेल्या ‘उडान’ या प्रसिद्ध शोचा ते भाग होते.

ab tak 56

97 चित्रपट आणि नाटकांमध्ये कामविक्रम गोखले यांनी 97 चित्रपट आणि नाट्य नाटकांमध्ये काम केले. त्यांनी 70 मराठी चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी 2022 मध्ये आलेल्या निकम्मा चित्रपटात दिसले. याशिवाय त्यांनी आंबेडकर- द लिजेंड या आगामी वेब सिरीजमध्ये देखील काम केले.

 

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

हैदराबादमधील भोईगुडा आडी येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 11 मजुरांचा मृत्यू

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1