-7.1 C
pune
January 26, 2023

पुणे : सामाजिक भान असलेले लेखक, कवी, समीक्षाकार जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयातच दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते .त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. समिक्षकार कोतापल्ले यांचे मराठी ग्रामीण साहित्यात फार मोठे योगदान होते. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख होती. नागनाथ कोतापल्ले हे अर्धशतकपासून साहित्य निर्मिती आणि समीक्षा लेखन करीत होते. 86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन चिपळूण चे सम्मेलन अध्यक्ष पद भूषविले होते. अनेक साहित्य संस्थांशी, चळवळीशी ते निगडित होते.


,’मध्यरात्र’ , अस्तित्वाची शुभ्र शिडे, ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. कृष्णमेघ मुड्स , दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू या कविता संग्रह हे यांचे गाजलेले आहेत.
तसेच गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ तसेच कर्फ्यू आणि इतर कथा ,कवीची गोष्ट , गदेवाचे डोळे, पराभव, मध्यरात्र, रक्त आणि पाऊस, राजधानी, सावित्रीचा निर्णय, उद्याच्या सुंदर दिवसांसाठी त्यांच्या अनेक कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. महात्मा फुले यांच्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. साहित्याचे समकालीन संदर्भ हे समीक्षा ग्रंथ पुस्तक जात, धर्म, परंपरा, संस्कृती यावर प्रकाश टाकणारे आहे. साहित्यसेवा करतानाच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी जिल्हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले.
नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.
नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले. १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६ मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते.

Related posts

हैद्राबाद मध्ये २०१९ एन्काउंटर पूर्णतः बनावट ; चौकशीचे आदेश

cradmin

हैदराबादेत मर्सिडीझमध्ये अल्पवयीन मुलीवर 11 वी 12 वी च्या विद्यार्थ्याचा गँगरेप

cradmin

हेरवाड ग्रामसभेचा ठराव; विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद!

cradmin

Leave a Comment

UA-220179981-1